मुंबई : अमृता फडणवीस यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत महिला दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ८ मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. या निमित्त का होईना आपल्या जवळच्या महिलांचा आदर सन्मान केला जातो.
समाजात स्त्रीचं एक वेगळं महत्व आहे ते पटवून देणारा हा दिवस असतो माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत महिला दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी मराठमोळा साज करुन त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
केवळ जीवन जगते आहे असे नाही,
तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे- ह्या विषयावर माझे काही विचार मांडते आणि ह्याच बाबत स्त्री शक्ति वर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनी ! #InternationalWomensDay pic.twitter.com/qcNpdithzC— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 7, 2021
“दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाला प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि या वर्षी देखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रीयांवर होणारे बलात्कार, वाईट प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रीयांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे.”
पुढे त्या म्हणाल्या कि, ‘मला हेच सांगायचं आहे की, स्त्रीयांच्याबाबतीत तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी कसे वागता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरोगामी महाराष्ट्रात काही बदल घडवून आणायचा असेल तर तो तुम्हीच घडवून आणू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही तिचा साथ द्या, त्यांना मागे ओढू नका… तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा…’ अशा प्रकारचे मत त्यांनी आज व्यक्त केलेले आहे.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी आपलं नवं गाणं येणार असल्याचं त्यांनी याआधी जाहीर केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खास मराठमोळ्या पेहरावातील फोटो देखील शेअर केले आहेत. हे गाणं स्त्रीशक्तीला समर्पित असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पक्वान्नाहूनही बळीराजाच्या घरातला आहार गोड लागतो’
- थर्माकोलवरुन तलाव पार करणाऱ्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
- ‘आज इंदिरा गांधींची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली’
- ‘…इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं ; अनुपम खेर यांनी घेतली ‘सोनी मॅक्स’ची फिरकी
- ‘आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

