Share

…तर लोकलसेवेवरही येऊ शकते गदा; मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याचं आकड्यांवरून समोर येत होतं. मात्र, यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची पुरेशी काळजी टाळल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा एकदा वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. योग्य वेळी या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचं दिसून येत आहे.

राज्य सरकार धोका लक्षात घेता वेळीच खबरदारी घेण्याच्या तयारीत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वक्तव्यांमधून स्पष्ट होत आहे. दुसरीकडं, कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर मुंबईकरांना नियमित व सोयीच्या वेळेत लोकलप्रवास करता येईल अशी अपेक्षा होती. राजेश टोपेंनी देखील याबाबत वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करून आता १५ दिवसांचा अवधी पूर्ण झाला असून या काळातील परिस्थितीचं निरीक्षण करूनच पुढील लोकल सेवेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत,मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी भाष्य केलं आहे. ’15 दिवसांचा कालावधी ऑब्जर्व्हेशनसाठी ठेवलेला आहे, तो 21 – 22 तारखेला संपुष्टात येणार आहे. त्यादरम्यान आम्ही पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊ आणि त्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रवासाचा निर्णय होईल,’ असं ते म्हणाले आहेत. अशातच, राज्यातील रुग्णसंख्येचा वाढत आलेख लक्षात घेता मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!