🕒 1 min read
टीम महारष्ट्र देशा : जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा भारताला होणार आहे. कारण अमेरिका, चीन आणि मेक्सिकोसारख्या देशांमध्ये व्यापारावरून तणाव वाढले आहेत. त्यामुळे जागतिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे. परिणामी याचा फटका खनिज तेलाच्या किंमतीला बसणार आहे.
सोमवारी कच्च्या तेलाची किंमत घसरून 61 डॉलर प्रती बॅरल झाली होती. गुरुवारी ही किंमत 70 डॉलर होती. चार दिवसांत तब्बल 9 डॉलरनी तेलाची किंमत उतरली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार जनतेला खुश करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घट करणार का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
व्यापारी युद्धामुळे 29 मे पासून पेट्रोल 56 आणि डिझेल 93 पैशांनी स्वस्त झाले आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल जर असेच घसरत राहीले तर भारतात इंधनाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय इंधन पुरविणाऱ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार दररोजचा दर ठरवत असतात. मात्र, किंमत कमी करायची असल्यास लगेचच कमी केली जात नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
