Share

लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ‘या’ दिवशी घेणार निरोप

Published On: 

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. येत्या २२ जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेतील आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.

मालिकेतील चांदवडी हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं. मालिकेतील कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार या मालिकेमुळे चांगले प्रसिद्धीस आले. अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली ही मालिकेचा प्रवास अखेर थांबतो आहे. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता दर्शकांना लागली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!