Share

ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची तयारी होती मात्र…

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव काल पासून सुरु झाला आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या लिलावामध्ये 8 टीमनं एकूण 57 खेळाडूंची खरेदी केली. पंजाबनं सर्वात जास्त 9 खेळाडू घेतले. दिल्ली आणि राजस्थान, कोलकाता आणि बंगळुरुनं प्रत्येकी 8, मुंबईनं 7, चेन्नईनं 6 तर हैदराबादनं सर्वात कमी 3 खेळाडू खरेदी केले. या लिलावात काही दिग्गज खेळाडूंना कुणीही खरेदी केलं नाही. त्यामध्ये एक खेळाडू असा होता ज्याच्यासाठी विराट कोहलीची 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मागच्या वर्षी श्रीलंकेचा फास्ट बॉलर इसुरु उदानाला 50 लाखांना घेतले होते. मात्र त्याला खरेदी करण्यासाठी बंगळुरुची त्यांच्याकडील सर्व 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती. बंगळुरुचे क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन यांनी मागच्या वर्षी झालेल्या लिलावानंतर याचा गौप्यस्फोट केला होता.

बंगळुरुनं मोठ्या अपेक्षेनं घेतलेल्या उदानाची मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमधील कामगिरी साधारण होती. त्यानं 10 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या. तसंच त्याचा इकॉनॉमी रेटही 9 पेक्षा जास्त होता. त्यामुळे या सिझनपूर्वी बंगळुरुनं त्याला रिलीज केले होते. या लिलावात उदाना पुन्हा एकदा सहभागी झाला होता. मात्र त्याला एकाही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही.

बंगळुरुच्या टीमनं या लिलावापूर्वी सर्वात जास्त खेळाडूंना रिलीज केलं होतं. त्यांनी या रिक्त जागा भरण्यासाठी यंदा जोरदार बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल साठी चेन्नई आणि बंगळुरुमध्ये जोरदार चुरस रंगली होती. अखेर बंगळुरुनं 14 कोटी 25 लाख रुपयांमध्ये मॅक्सवेलला खरेदी केलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!