औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पेट चा दुसरा पेपर विद्यार्थ्यांना घरुन देण्यास मान्यता द्यावी, या संदर्भात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी गुरुवारी फेटाळून लावली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेची ( पेट ) प्रक्रिया सध्या राबवण्यात येत आहे. ‘पेट’ चा पहिला पेपर ऑनलाईन पद्धतीने ३० जानेवारीला घेण्यात आला होता. या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या काही तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच पेटचा दुसरा पेपर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनेच तेथे घरुन देण्याऐवजी परीक्षा केंद्रावरुन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या निर्णयाला महम्मद यासीन व अतुल राजेंद्र कांबळे यांनी उच्च न्यायालयात याचिकाद्वारे बुधवारी (दि. १७ ) आव्हान दिले होते. विद्यार्थ्यांना पेटचा दुसरा पेपर सेंटर ऐवजी घरुन घेण्यास विद्यापीठास आदेशित करावे, असे याचिकेत म्हटलेले होते.
शासनाच्या निर्णयानुसार कोविंड संदर्भात सर्वोतोपरी उपायोजना करुन ही परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्यावतीने स्पष्ट केले. अखेरीस उच्च न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली आहे. विद्यापीठाच्यावतीने वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले तर विधी अधिकारी किशोर नाडे यांनी सहकार्य केले. याचिकाकर्त्यांतर्फे वकील तब्रेजुद्दीन कादरी यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालयांवर मनपाच्या पथकांचा वॉच
- ‘पूजा अरुण राठोड’च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण’
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’
- ‘पेशंट रस्त्यांवर बोंबलत फिरताहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा’, सुनिल केंद्रेकरांचे आदेश
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’


