पंढरपूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे पंढरपूरच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. सद्या शेतकऱ्यांवर चहू बाजूनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला लोकप्रतिनिधींना जबाबदार धरलं आहे.
शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळत नाही उलट त्यांचं शोषण केलं जात, त्यामुळे टोकाचा निर्णय घेत ते आपला जीव देतात. त्यांच्या या मरणाला लोकप्रतिनिधीच जबाबदार आहे, असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ३ दिवसात भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’ असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबद्दल तक्रारी केल्या असून केंद्राकडून पाठपुरावा करण्याच आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राजकीय सूडबुद्धीने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी- मोनिका राजळे
- शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारला काही मर्यादा त्यामुळे केंद्रानेही मदत करावी – शरद पवार
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा ; संभाजीराजेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला
- कांद्याने खाल्ला भाव: पारनेरमध्ये कांद्याला ६४०० रुपये प्रति क्विंटलचा दर!


