Share

फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा ; संभाजीराजेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याचा आढावा दौरा करणार आहेत.

भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ३ दिवसात भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’ असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबद्दल तक्रारी केल्या असून केंद्राकडून पाठपुरावा करण्याच आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

पवार घेणार मोदींची भेट

शरद पवारांनी आज उस्मानाबादमधील गावांतील शेतकऱ्यांची भेट व नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!