🕒 1 min read
पुणे : महाविकास आघाडीचे सरकार येवून वर्ष झाले मात्र या आघाडीतील छोटे-मोठे घटक पक्ष अजूनही सत्तेतील वाटा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांचा गत असो किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गट या दोनही पक्षांना म्हणावा तेवढा सत्तेतील वाटा मिळाला नसल्याचे चित्र आहे.
2014 साली लोकसभा निवडणुकीत माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेस पक्षाला पाठींबा दिला त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना विधानपरिषद दिली.तर स्वर्गीय आर आर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सचिन खरात यांना आणले.समोर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचे तगडे आव्हान असताना देखील आंबेडकरी चळवळीतील या दोन्ही पक्षांनी 2019 ला सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यभर प्रचार केला. सचिन खरात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका व राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली परिवर्तन यात्रा, हल्लाबोल यात्रा, शिवस्वराज्य यात्रा मध्ये राज्यभरात फिरत होते
दरम्यान,महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर जोगेंद्र कवाडे यांना आमदारकीची अपेक्षा होती मात्र त्यांना ते पद मिळाले नाही. मध्यंतरी विधानपरिषद जागेसाठी आंबेडकरी समाजात या दोन्ही पक्षांना काही तरी मिळेल अशी चर्चा होती पण काँग्रेस तर्फे गायक अनिरुद्ध बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आनंद शिंदे यांचे नाव पुढे केल्याने या दोन्ही पक्षांच्या पदरी निराशा आली.
दरम्यान, या संदर्भात आम्ही जेष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांच्या सोबत संवाद साधला असता त्यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेबाबत काहीशी नाराजी बोलून दाखवली.खरतर विधान सभा निवडणुकीच्यावेळी आम्हाला विधानपरिषदेची एक जागा देवू असे सांगण्यात आले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आता निदान आमच्या कार्यकर्त्यांना महामंडळ,जिल्हा-तालुका कमिट्या यामध्ये स्थान मिळावे हि अपेक्षा आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आमचे या संदर्भात बोलणे झाले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मोठ्या उदार मनाचे नेते असल्याने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशी देखील मागणी त्यांनी केली. अडचणीच्या काळात आम्ही या पक्षांसोबत राहिलो त्यामुळे सत्तेतील आमचा वाटा आम्हाला मिळावा असे ते म्हणाले.
याच संदर्भात खरात यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला सावध प्रतिक्रिया दिली. खा.शरद पवार ,अजित पवार आणि जयंत पाटील मला योग्य वेळी न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, महायुतीचे सरकार असताना फडणवीस यांना सुद्धा घटक पक्षांना सोबत घेवून वाटचाल करताना मोठी कसरत करावी लागली.काही प्रमाणात मित्रपक्षात नाराजी जरी त्यावेळी पाहायला मिळाली असली तरीही फडणविसांनी मेटे-जानकर-आणि खोत यांना महत्वाची पदे देत न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.आता भाजपच्या पावलावार पाऊल ठेवत महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना कसा न्याय देणार याबद्दल चर्चा सुरु आहे तसेच आगामी काळात नेमकं महाविकास आघाडीकडून काय दिले जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
- ममतादीदींच्या अडचणी वाढल्या,जेष्ठ मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- टीम इंडियानं सर्वांना ‘आत्मनिर्भर’तेचा धडा शिकवला : मोदी
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
