सांगली : देशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. ते मोडून काढण्याचे मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीत आपणच परस्परच आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
नव्या कायद्याद्वारे शेतकरी व कामगार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते हाणून पाडायला हवेत. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. चांगल्या कंपन्या विकण्याचा सपाटा सुरू आहे. काँग्रेसवाल्यांनी चळवळ संपवण्याचे काम केले अशी टीका शेट्टी यांनी केली.
दरम्यान, गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता साखर कारखान्यांना २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
यावरून राजू शेट्टी यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. ‘सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयातील असमन्वयाचा गोंधळ संपवून ‘एफआरपी’पेक्षा जादा ऊसदर देणाऱ्या साखर कारखान्यावर आकारलेला आयकर रद्द करून एक चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.
‘सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयातील असमन्वयाचा गोंधळ संपवून ‘एफआरपी’पेक्षा जादा ऊसदर देणाऱ्या साखर कारखान्यावर आकारलेला आयकर रद्द करून एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! आता ऊसदर नियंत्रण समितीच्या मान्यतेने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना ‘एफआरपी’पेक्षा जादा दर देता येईल. अमित शहा यांनी असाच निर्णय घेऊन नीती आयोगाने सुचवलेल्या तीन टप्प्यातील ‘एफआरपी’ देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे ट्विट शेट्टी यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- ‘एका महिलेवर खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’ क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

