मुंबई : एका गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली ढिंच्यॅक पूजा दरम्यान दिसली नसली तरी, आता एक नवं गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यामुळे ढिंच्यॅक पूजाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
पुजाला २०१७ मध्ये ‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून लोकप्रियता मिळली. आता नव्या या गाण्याचे नाव ‘दिलोंका शूटर २.०’ असे आहे. ढिंच्यॅक पूजाचे ‘दिलोंका शूटर २.०’हे गाणे नुुकतेच रिलिज झाले आहे. या गाण्यामध्ये ढिंच्यॅक पूजा गाडी चालवत गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला देखील काही मुले गाडीवर दिसत आहेत. ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर, मुझसा ना कोई क्यूटर’ असे या गाण्याचे बोल आहे. यूट्यूबवर हे गाणे आता पर्यंत हजारों लोकांनी पाहिले आहे. ढिंच्यॅक पूजाचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिच्यावर भरपूर टिका केली जात आहे. ढिंच्यॅक पूजाचे गाणे ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागले, ढिंच्यॅक पूजाची गाणी ही टोनी कक्करपेक्षा चांगली असतात असे म्हटले आहे. तर काहींना छान आहे, असं ही म्हटलं आहे.
ढिंच्यॅक पूजा एक युटूबवर आहे. ती आपल्या अनोख्या रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ‘बापू देदे थोडा कॅश’, स्वॅग वाली टोपी, होगा ना करोना, दिलोंका शूटर यांसारख्या अनेक गाण्यांची निर्मिती आजवर तिने केली आहे. मात्र ‘सेल्फी मैंने ले ली आज’ गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या गाण्यामुळे तिला चक्क बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकण्याची संधी मिळाली होती. आता तिचे ‘दिलोंका शूटर २.०’ प्रदर्शित झाले असून या गाण्यामुळे तिच्यावर टिका ही होऊ लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- लालबागेतील आगीला व्यवस्थापन जबाबदार, महापौर किशोरी पेडणेकर
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

