Share

कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलालाच, मनसेचा आरोप

Published On: 

मुंबई : गेले ५ महिने राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता रुग्णांच्या सोयीसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने विलगीकरण व उपचार करता यावे यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करत युद्धपातळीवर जम्बो रुग्णालय व कोविड सेंटर्सची निर्मिती केली. मात्र, आता संतापजनक बाब समोर येत आहे. पदाचा गैरवापर करत आपल्याच मुलाला कोविड सेंटरचे काम दिल्याचा आरोप मनसेने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर लावला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  “आपल्याच मुलाला कोव्हिड सेंटर्सचे काम देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी सगळ्यात आधी राजीनामा दिला पाहिजे” , अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ असा सवाल देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला.

फडणवीस आणि त्यांच्या टोळीने राज्याचा कारभार कसा करावा हे शिकवू नये : रुपाली चाकणकर

मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोप केले. महापौरांनी मात्र  आरोप फेटाळून लावत मनसेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “कोव्हिडच्या काळात महापालिकेत मोठे घोटाळे झाले. घोटाळे करण्यात शिवसेना सगळ्यात पुढे आहे. कोव्हिड सेंटर्सच्या नावाखाली शेकडो कोटींचे घोटाळे झाले. किश कंपनी नेमकी कोणाची आहे?” असा सवाल मनसेने उपस्थित केला.

अजब सरकार गजब निर्णय, शौमिका महाडिकांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

“आमदार राजू पाटील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. विरोधी पक्षाने यात लक्ष घालावं, अधिवेशनात जाब विचारावा, उद्धव ठाकरे जनतेतून जरी निवडून आले नसले, तरी आता ते मुख्यमंत्री आहेत. या पदासाठी कितपत योग्य ते उतरतात हे आता कळेल” असे आव्हान संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तसेच, “राजकारण करु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे भ्रष्टाचार करायला मोकळं सोडा का? आमच्यापुढे येऊ नका, असा का? मुंबईतले कोव्हिड सेंटर नेमके कोणाकोणाला दिले, याचा शोध आम्ही घेणार. ही सुरुवात आहे. यात सगळ्यांनी लक्ष द्यावं”, असे मनसेतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरातील कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!