Share

फडणवीस आणि त्यांच्या टोळीने राज्याचा कारभार कसा करावा हे शिकवू नये : रुपाली चाकणकर

Published On: 

मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी होत असलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला अखेर मान्यता दिली. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

यानंतर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून या प्रकरणी अनेक बड्या व्यक्तींची नावे बाहेर येण्याच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला होता. तर, बिहार पोलिसांनी मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील केली होती.

अजब सरकार गजब निर्णय, शौमिका महाडिकांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

काल, सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्य सरकारवर घणाघाती टीका केल्याचे दिसून आले. तसेच, राज्य सरकारच्या भूमिकांमुळे आता मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असल्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. यावर, आता सामना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरातील कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर आरोप लावत जशास तसे उत्तर दिले आहे. “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या,  तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये !”  असा घणाघातच त्यांनी केला आहे.

मोठी बातमी: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!