नवी दिल्ली : भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. जगभरात कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरू आहे. तोपर्यंत सर्व रुग्णांवर अँटीव्हायरल औधषांनी उपचार केले जात आहेत. नुकतंच केंद्र सरकारने ग्लेनमार्क या संस्थेला कोरोनावरील उपचारासाठी गोळ्यांच्या उत्पादनाला परवानगी दिलीय.
नरेंद्र मोदी यांचे नावच राहुल गांधींनी टाकले बदलून, म्हणाले हे तर ‘सरेंडर मोदी
ग्लेनमार्क फार्मासिटिकल कंपनी कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषधाचे उत्पादन करणार आहे. या अँटीव्हायरल गोळ्या असून याच्या उत्पादनासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) परवानगी मिळाली आहे.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार हे अँटिव्हायरल औषध घेतल्यानंतर कोरोना बरा होतो. कोविड-19 ची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना हे औषध बरं करेल असही या कंपनीनं म्हटलं आहे. वैद्यकीय चाचणीदरम्यान हे औषध परिणामकारक ठरल्यानं कोरोनावरील उपचारासाठी या गोळ्या देण्याची परवानगी मिळाली आहे.
चाचणीमध्ये फॅबिफ्लूचा डोस दिल्यानंतर रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. या गोळीची किंमत प्रति टॅबलेट 103 रुपयांना असणार आहे. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं अशी माहिती आणि सूचना ग्लेनमार्कचे अध्यक्ष ग्लेन सल्डाना यांनी सांगितलं आहे. सध्या कोरोनावर कोणतीही लस नाही आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये हे औषध संजीवनी ठरेल.
‘मुख्यमंत्री म्हणतात घरात बसा तर भुजबळ म्हणतात घराबाहेर पडा’
महाराष्ट्रात शनिवारी रुग्णवाढीचा आणि मृत्यूंचा नवा उच्चांक झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात3874 नवे रुग्ण आढळले. तर शनिवारी तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात राज्यात एकूण 128205 रुग्ण झाले आहेत. तर 5148 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. राज्यातल्या 160 पैकी तब्बल 136 मृत्यू फक्त मुंबईतले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

