Share

बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी, शेकापची मागणी

Published On: 

बीड : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव बाजार समिती ओळखली जाते. यंदा माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासह, टरबुज, पपई, मोसंबी, खरबुज आदी फळांची मोठी लागवड केली आहे. परंतू माजलगाव बाजार समिती केवळ सोयाबीन, तूर, बाजरी, गहु ,ज्वारी, हरभरा हे धान्ये खरेदी करून उर्वरीत पिकांची खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प किमतीत भाजीपाला व फळे खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. या अनुषंगाने बाजार समितीने फळांची खरेदी करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आवश्यक वाहतूक उपलब्ध नसल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील न मिळाल्यामुळे अनेक खासगी सावकारांचे उंबरठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. परंतू लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा भाजीपाला व फळे रस्त्यावर फेकुन द्यायला शासन व शासनाचे जवाबदार प्रतिनिधी भाग पाडत आहेत.

शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माजलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करावी. फळपिकांची तत्काळ खरेदी व विक्री करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. अन्यथा आसुड आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!