मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनातील आंदोलक तरुणाला भोवळ आली. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. त्यानंतर परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आंदोलकाची मंत्रालयात एक बैठक घेतली.
सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारकडून पुढे काही निर्णय होईल असं वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलक आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.’ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली.यावेळी सरकारने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून आंदोलन तीव्र करतील, असा इशारा शिष्टमंडळानं सरकारला दिला.
या बैठकीत अनेक गोष्टींवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. मात्र, सरकार आमच्या मागण्यांवर सकारात्मक नसल्याचे बैठकीनंतर आंदोलकांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनीच सुप्रिम कोर्टात जावे, सरकार आपली बाजू मांडत आहे. राज्यात 35 हजार जागा खाली आहे. मात्र, या रिकाम्या जागांवर उमेदवार भरायला सरकार तयार नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आता हे आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिलाय. तर या प्रश्नावर कायदेशीर पद्धतीने काय करता येईल, हे पाहू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.
तसेच किमान 11 महिन्याच्या करारावर विद्यार्थ्यांना जॉईन करुन घ्या, अशी मागणी आम्ही केली. मात्र, सरकारने ही गोष्ट मान्य केली नाही. इथले अधिकारी नकारात्मक पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही यावेळी शिष्ट मंडळाने केलाय. आंदोलकांनी केलेल्या मागण्या जोपर्यंत मागण्या मान्य होतं नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे आज दुपारी 12 वाजता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले देखील आंदोलकांची भेट घेणार आहेत. यावेळी राज्यातील मराठा समाजातील समन्वयक एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

