मुंबई: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर ७ जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करत घराच्या काचांवरही दगडफेक झाली होती. तर कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले होते. यानंतर काल २२जुलै रोजी मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव असून तो 20 वर्षांचा आहे. तर ७ जुलै रोजी झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीचे नाव उमेश सीताराम जाधव असं आहे. उमेश हा हल्लेखोरांच्या सोबत होता. उमेशकडून माहिती घेऊन पोलीस प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते. मुख्य आरोपी विठ्ठल काण्या हा मजूर आहे. तो कल्याण स्टेशन येथे राहतो.
आता खऱ्या शिवसैनिक शोभता, कॉंग्रेस नेत्याकडून मराठीत शपथ घेणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींचं कौतुक
काय आहे हे प्रकरण?
दोन माथेफिरुंनी मंगळवारी ७ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचत तपास करत सुरु केला होता. तर आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले होते. विचारवंत, राजकारणी, समाजकारणी, अनेक चळवळीतील नेते, यांसह सर्वांनीच या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.
दिलासादायक: कोरोना चाचणीचे दर होणार कमी!
दरम्यान, दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.
…तर मोदींना सुद्धा ५ ऑगस्टचा राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा – इम्तियाज जलील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

