औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा साधेपणानं ईद साजरा करण्यात यावी, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाला यासंदर्भात आवाहन केलं आहे. बकरी ईदसाठी शासनाकडून नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. मात्र ही नियमावली अमान्य असल्याचं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला आहे.
यंदा ईदसाठी ऑनलाईन खरेदी विक्री करण्यात यावी, असे आदेश शासनानं दिले आहेत. त्यावर जलील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ज्यांना शक्य असेल, ती मंडळी ऑनलाईन खरेदी, विक्री करू शकतील. पण एक, दोन जनावरं असलेल्या व्यक्तींनी काय करायचं? नेते, अधिकारी यांच्याकडे स्मार्टफोन असतात. गरिबांकडे ती सोय नसते. त्यांचा विचार कोण करणार? जनावरं विकून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा?,’ अशी प्रश्नांची सरबत्ती जलील यांनी केली आहे.
‘शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषिवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करा’
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले नियम केवळ आमच्यासाठीच आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला. गर्दी टाळण्यासाठी आम्हाला निर्देश देण्यात येतात. हेच नियम पंतप्रधान मोदींना लागू होत नाहीत का? त्यांनादेखील ५ ऑगस्टचा राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा. त्यांना दिल्लीतून प्रतिकात्मक भूमिपूजन करू द्या’, अशा शब्दांत जलील यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, मागील चार महिन्यांपासून लोकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. आता शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. १ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा साजरी केली जाणार आहे. त्यासोबत श्रावण, गणेशोत्सव, मोहरम येणार आहे. त्यामुळे आता नियम, अटींसह सर्व धार्मिळ स्थळे उघडावीत; तसेच ईद-उल-अजहाची नमाज ईदगाहवर अदा करू द्यावी, अशी मागणी मौलवींची आहे. प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही, ती कशी असते, हेही शासनाने स्पष्ट करायला हवे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
संतापजनक! तपासणीसाठी आलेल्या पथकलाच ग्रामस्थांनी हाकलले; अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील केल्याचे वृत्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

