अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- महाराष्ट्रात आज सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होऊन भाजपची सत्ता येणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे वक्तव्य म्हणजे कवितेचे ध्रुवपद आहे.
राज्यातील त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांना मानसिक धीर देण्यासाठी, त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांना असं बोलावं लागत आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनतेसाठी काम करत असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ना.थोरात म्हणाले की, रिपब्लिकन वाहिनीने सातत्याने लोकशाही विरोधात व चुकीच्या मार्गाने असत्य गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व आर्थिक स्रोत वाढवण्याचा प्रयत्न केला. पैसे देऊन बोगस टीआरपी वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने सत्य जनतेसमोर आले आहे. तसेच अर्णव गोस्वामी ह्या पत्रकारावर लवकरात लवकर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी ना.थोरात यांनी केली आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल ना.थोरात म्हणाले की, नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते असून भारतीय जनता पार्टी वाढविण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
खडसे यांना कॅमेरासमोर येऊ नये अशी बंदी घालणे योग्य नाही. २०१४ साली त्यांच्या योगदानामुळेच भाजप व शिवसेनेचे सरकार आले होते. मात्र, अशा ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक अयोग्य असल्याने त्यांना संताप येणे सहाजिक आहे, असे ना.थोरात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- लोकशाहीचा चौथास्तंभ कमजोर करण्याचे कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड
- #TRPSCAM : ‘आघाडी सरकारच्या अपयशावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी वाहिन्यांवर कारवाई’
- मंदिरे उघडण्यासाठी भाविकांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
- मालवाहतुक अभियान : रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

