टीम महाराष्ट्र देशा – जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन आणि शिवसेनेला हादरा बसला असून या निवडणुकीत ७५ जागांपैकी भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले असून सुरेश जैन यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते. भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास या निकालावरून स्पष्ट झालंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय.
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १ ऑगस्टरोजी मतदान झाले होते. या जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात होते. जळगावमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. जळगावमध्ये सुरुवातीला शिवसेना- भाजपा युती झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही रिंगणात असली तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात होती.या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही.
दरम्यान,मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला.
ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते : पाशा पटेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

