Share

…अन् वकिलानेच पाठवली पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी

Published On: 

सोलापूर : बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. या ना त्या कारणावरून बार्शी नेहमीच चर्चेत असते. आता एका नव्याच पण मजेशीर अन तितक्याच गंभीर कारणाने बार्शी तालुका चर्चेत आला आहे. बार्शी तालुक्यातील अवैध गांजा विक्री बंद व्हावी म्हणून येथील एका वकिलाने थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना तक्रारी अर्जासह चक्क गांजाची पुडी पोस्टाने पाठवली आहे. अॅड सुहास कांबळे असे त्या वकीलाचे नाव आहे.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून बार्शी शहर व तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यातल्या त्यात खुलेआम गांजा विक्रीने तर कहरच केला आहे. स्थानिक पोलिस प्रशासन आणि जिल्हा पोलिस प्रशासन या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आपल्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे या तालुक्यातील अवैध धंदेवाले चांगलेच सोकाळले आहेत. पोलीस खात्यातील काही अधिकारी अवैध धंदे वाल्या कडून मिळणाऱ्या वर कमाईला चांगले चटावलेले असल्याचा आरोप अॅडवोकेट कांबळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केला.

सध्या बार्शी परिसरातील तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या गोष्टीला आवर बसावी म्हणून बार्शी येथील अॅडवोकेट सुहास कांबळे या वकिलाने सामाजिक बांधिलकीतून वेळोवेळी जिल्हा पोलिस प्रशासना पासून ते राज्याच्या पोलिस महासंचालकांना पर्यंत तक्रारी अर्ज केले आहेत. प्रसंगी लक्षवेधी आंदोलने देखील केली आहेत. मात्र त्यांच्या मागणीची कोणतीच दखल पोलिस प्रशासनाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी बार्शी शहरातून एक गांजाची पुडी खरेदी केली. (याचे चित्रीकरण देखील त्यांनी केले आहे.) ती पुडी त्यांनी आपल्या तक्रारी अर्जासह कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना पोस्टाने पाठविली आहे. किमान यामुळे तरी जिल्हा पोलिस प्रशासनाचे डोळे उघडतील अशी त्यांची यामागची भावना आहे.

बार्शीचे राजकारण नवे वळण घेण्याची शक्यता, बाळराजे पाटील-अनगरकरांचा बार्शी संपर्क वाढला…

या घटनेमुळे बार्शी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वीचे पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी उगारलेल्या कायद्याच्या बडग्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून अवैध धंदे तडीपार झाले होते. त्यानंतर आलेल्या पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेऊन शिस्तीच्या पाटीलकीचा नमुना दाखवत अवैध धंद्यांना हद्दपार करण्याची मागणी होत आहे.

बार्शी शहरासह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मटका, दारु आणि गांजा विक्री हे धंदे खुलेआम सुरु आहेत. सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. हा प्रकार रोखण्यासाठी मी वेळोवेळी तक्रारी देऊन आंदोलन देखील केले आहेत. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. या पूर्वीचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांचे विशेष पथक कार्यक्षम होते. मात्र आताचे विशेष पथक जुजबी कारवायांचा फार्स करीत आहे. त्यामुळेच मी वेगळ्या पद्धतीने विशेष पोलिस महानिरीक्षकांना न्याय मागितला आहे. असे अॅड. सुहास कांबळे म्हणाले.

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!