औरंगाबाद : वरठाण बनोटी गोदेंगाव आदी परीसरात गेल्या पंधरा पाउसचा थेंबही नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे. एक ते दोन दिवसात पाऊस आला नाही तर पुर्ण खरीप हंगामातील पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या वर्षी देखील बळीराजाच्या शेतीचे आर्थीक गणित बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.
वरठाण सह तिडक,बनोटी,गोदेंगाव ,कींन्ही,पहुरी वाडी,पळाशी,आदी परीसरात कपाशी व मका पीकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. तसेच ज्वारी बाजरी उडीद मुग देखील पेरणी झालेली असुन या वर्षी सुरवातीला बर्यापैकी पाऊस असल्याने सर्वत्र परीसरात लागवड झालेली पिके चांगल्यापैकी होते. सद्या या पीकाची कोळपणी झाली असुन निदणीचे काम चालु आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने ही पिके कोमजु लागली असुन त्यांनी पाण्याअभावी त्यांनी माना खाली टाकलेल्या आहेत.
उन्हाळा पेक्षाही भयकंर तापमान होत असुन दिवसभर मोठ्या प्रमाणावर उकाडा होत आहे. आज न उद्या पाऊस येणार या आशाने शेतकरी आपले डोळे आकाशाकडे लावून आहे. कोवळ्या पिकाची परीस्यिती शेतकरीकडुन पाहील्या जात नसल्याने पावसाअभावी बळीराजा हवालदील झाला आहे पाउसच येत नसल्याने शेतकरीने निदणी देखील बंद केल्याने सद्या ह्या चार दिवसापासुन मजुरांच्या हाताला देखील काम नसल्याने त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे
पाण्याअभावी कपाशी मका पिकाची वाढ खुटंली असुन ती पिके वाळत आहे सुरवातीला हवामान खात्याने ह्या वर्षी १०० टक्के पाऊस सांगितले असतांना सद्या तर दुष्काकाच्या छायेत शेतकरी जगत आहेत महागडी बियाने लागवडीचा खर्च निदणी कोळपणी आदी खर्च करुन बळीराजा मोकळा झाला आहे प्रतिक्षा फक्त पावसाची आहे परंतु येत्या दोन दीवसात जर पाऊस आलाच नाही तर सर्व खरीप हंगाम शेतकरीच्या हातातुन निघुन जाणार असल्याचे चित्र दीसुन येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो


