नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.
आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. राज्यभरातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते यांचा ह्या बंद मध्ये सक्रिय सहभाग होणार आहे. राज्यभरातील जिल्हाधिकारी/तहसील कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा/तालुका पदाधिकारी भेटून निवेदन देणार आहेत व मोदी सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा त्वरित मागे घ्यावा ही मागणी करणार आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांनी बंद पाळला असून शेतकऱ्यांचे समर्थन करीत आहे.
दरम्यान, एका बाजूला रस्त्यावर हि लढाई सुरु असताना आता न्यायालयीन लढाईचा देखील सामना मोदी सरकारला करावा लागणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत केरळचे कृषी मंत्री व्ही. एस. सुनिल कुमार यांनी सांगितलं की,संसदेत हे कायदे पारित झाल्यापासूनच मुख्यमंत्री त्या विरोधात होते. त्यामुळे आता केरळ सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दलालांची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे’
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- ‘मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’

