नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत कसोटी मालिका आणि टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका (SA vs IND) दौऱ्यावर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. भारतीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा (Rahul Dravid) हा पहिलाच परदेशी दौरा असणारा आहे.
या दौऱ्यावर सर्वांच्या नजरा कर्णधार विराट कोहली आणि राहुल द्रविड या जोडीवर लागल्या असून, सर्वांना चांगल्या निकालाची आशा आहे. यातच भारताचा माजी खेळाडू निखिल चोप्रालाही (Nikhil Chopra) अशीच अपेक्षा आहे. चोप्राच्या मते, विराट आणि द्रविड या नव्या जोडीचा भारतीय संघाला फायदा होईल. दोन्ही व्यक्तींची क्षमता पाहता ते उत्तम काम करू शकतात, असा त्याचा विश्वास आहे.
निखिल चोप्राने खेलनीती पॉडकास्टवर विराट आणि द्रविडच्या जोडीवर भाष्य केले आहे. चोप्रा आपल्या कारकिर्दीत द्रविडसोबत खेळला आहे. निर्णायक दौऱ्यापूर्वी द्रविड मानसिकदृष्ट्या तयार होण्याचा आग्रह कसा धरेल याबद्दल चोप्रा बोलला आहे.
त्याने सांगितले की उजव्या हाताचा फलंदाज विशेषत: आव्हानात्मक परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमी कसा तयार असतो. चोप्रा याने द्रविडला “आश्चर्यकारक विद्यार्थी” असे संबोधले आहे कारण तो ज्या भागात सुधारणा करू शकतो ते ओळखण्यास तो नेहमीच उत्सुक असतो.
चोप्रा म्हणाला, राहुल द्रविड हा अप्रतिम विद्यार्थी आहे. त्याची मानसिक तयारी नेहमीच चांगली असते, विशेषतः कठीण परिस्थितीत. मला खात्री आहे की विराट कोहली आणि राहुल द्रविडची भागीदारी चांगले परिणाम देईल.
महत्त्वाच्या बातम्या
- “कुंपणच शेत खात असेल तर…” पेपरफुटीवरुन दरेकरांचा घणाघात
- सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘KGF Chapter 2’ अव्वल स्थानी
- वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया
- “ज्वलंत हिंदुत्व UPA च्या दावणीला…” भाजपाची शिवसेनेवर खोचक टीका
- “बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं…” ; सदाभाऊ खोतांनी घेतली फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

