नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs SA) निवडलेल्या भारतीय संघात तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) समावेश करण्यात आला नाही. यावरच भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने सुंदरला संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारताला 26 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि निवडकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी 18 जणांचा संघ जाहीर केला होता. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल दुखापतींमुळे संघात नाहीत. भारताने रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे.
आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सुंदर नियमित कसोटी संघाचा सदस्य असूनही त्याचा दक्षिण आफ्रीकेविरुधाच्या संघात समावेश नाही असे विचारले अस्ताला त्याने उत्तर दिले, ‘मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, तो कुठे आहे? हे माझ्यासाठी थोडे आश्चर्यकारक आहे. तुमचे सगळे फिरकीपटू दुखापतग्रस्त असल्याने यावर कोणी का बोलत नाही याचे मला आश्चर्य वाटते. जडेजा जखमी झाला, अक्षर जखमी झाला, तरीही तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये कोणताही लेग स्पिनर खेळवत नाही आणि कुलदीप यादवला परत आणू इच्छित नाही.
चोप्राच्या म्हणण्यानुसार, दुखापतग्रस्त जडेजाच्या बदल्यात सुंदर हा एक चांगला खेळाडू ठरला असता. जयंतने मुंबई कसोटीत चांगली कामगिरी केली आणि त्यासाठी तुम्ही त्याला कायम ठेवले पण फक्त जयंत आणि अश्विन हे दोनच फिरकीपटू आहेत. तुम्ही वॉशिंग्टनचा विचारही केला नाही. संतुलनासाठी तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळवायचे असते तर जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सहज फिट झाला असता.
वॉशिंग्टन सुंदरची निवड न करण्याचे कोणतेही कारण दिले नाही – आकाश चोप्रा
वॉशिंग्टन सुंदरने दुखापत होण्यापूर्वी कसोटी संघात चांगली कामगिरी केली होती आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे पण त्याला का निवडले नाही याचे उत्तर कोणीही दिलेले नाही. याबाबत चोप्रा म्हणाला, पण त्याचा अजिबात विचार न करणे, त्याच्याबद्दल अजिबात न बोलणे, तो जखमी किंवा अनुपलब्ध आहे हे कोणालाही न सांगणे किंवा व त्याचा संघात समावेश का केला गेला नाही हे न सांगणे ठीक नाही.
निवडकर्त्यांनी याबाबत पारदर्शकता दाखवली असती तर सर्व काही स्पष्ट झाले असते, असे मत माजी सलामीवीराचे आहे. तो म्हणाला, मला वाटतं वॉशिंग्टन सुंदर यांच्याबद्दल चर्चा व्हायला हवी होती आणि जर तो निवडून आला नाही तर जाहीर खुलासा व्हायला हवा होता.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील १०५ नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
- …त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
- “संजय राऊत आणि कंपनी शिवसेनेला…”; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत राम सातपुतेंची टीका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर


