Share

डोंबिवलीतील घटना माणुसकीला काळीमा फासणारी- निलेश राणे

Published On: 

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असतानाच हि घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान यावर आता भाजपने सरकारला घेरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या विविध नेत्यांकडून सकाळपासून सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान यावर आता भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून यावर भाष्य केले आहे.

‘डोंबिवली भोपर मध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुन्हा घडली आहे.’ असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. भाजपच्या नेत्या व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘सर्वज्ञानी संजय राऊतजी डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडलीये कळलयं का आपल्याला आता कुणाचं थोबाडं फोडायचं संजयजी? आहे का सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आपल्यात ?’ असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना धारेवर धरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!