Share

पोषण ट्रॅक अॅप मराठीत करा; अंगणवाडी सेविकांचा संप पुकारण्याचा इशारा!

Published On: 

औरंगाबाद : अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पोषण ट्रॅक हे इंग्रजी भाषेत असून ते मराठी भाषेत करण्यात यावे अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र तरीही मागणी मान्य न झाल्याने येत्या २४ तारखेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम बंद करून संप पुकारणार असल्याची माहिती आयटकचे अॅड. अभय टाकसाळ यांनी दिली.

पोषण ट्रॅकर अॅप इंग्रजी भाषेत असून ते मराठी भाषेत करावे. अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात आहे. मात्र आंदोलन करूनही मागणी मान्य झालेल्या नाही. त्यामुळे एक दिवस काम बंद करून संप पुकारण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याचबरोबर  अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.

याशिवाय केरळ सरकारने अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन दिले आहे. केरळ सरकारप्रमाणे आपल्याकडील अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे. याशिवाय कोव्हीड काळात मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी – बालवाडी कर्मचारी युनियन आणि आयटकचे राम बाहेती, ऍड. अभय टाकसाळ, तारा बनसोडे सह आदींच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!