मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे भारतात प्रचंड रोष ओढवला. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. या भागातील अनेक लोकांचे या वादामुळे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका अजय देवगण याच्या आगामी चित्रपटाच्या सेटलाही बसला आहे. या चक्रीवादळाने अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटाच्या सेटचे मोठे नुकसान केले आहे.
या चित्रपटाच्या सेटचे नुकसान होण्याची ही आतापर्यंतची दुसरी वेळ आहे. यापूर्वी १६ एकर मध्ये बांधलेल्या या हायकॉस्ट मेंटेनन्स असणाऱ्या सेटला मे २०२० साली कोविड-१९ च्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊन आणि पाऊस यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका बसल्याने त्यांना आर्थिक नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळ आले तेव्हा सेटवर सुमारे ४० लोक उपस्थित होते. सेट वाचवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु, भयावह वादळासमोर त्यांचा टिकाव लागला नाही.
https://www.instagram.com/p/CCNSgBlpqsg/?utm_source=ig_embed&ig_rid=37489273-6560-43bf-af6d-a4977e693b22
या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर करत असून अमित शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ३१ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील १५ दिवसांतच या चित्रपटाचे उर्वरीत चित्रीकरण दिग्दर्शक अमित शर्मा पूर्ण करणार होते. आगामी चित्रपट ‘मैदान’चे आऊटडोअर शूटिंग कोलकाता आणि लखनऊ येथे करण्यात येत आहे. मात्र चक्रीवादळामुळे सेटचे नुकसान झाले असल्याने पुढील चित्रीकरणाला आता थोडा वेळ लागण्याची शक्यता असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- अखेर रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी


