Share

पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे हा इतिहास झाला, यावेळी आमचा उमेदवार जिंकेल- बाळासाहेब थोरात

Published On: 

नागपूर : येत्या एक डिसेंबरला नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली असून आज वंजारी यांच्याकडून अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, असे जे सांगितले जाते, हा इतिहास झाला, आता यावेळी आमचा उमेदवार जिंकेल, हे नक्की आहे.

अभिजीत वंजारी गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत, असे मत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

ना.थोरात पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या सर्वच जागा जिंकून येतील. आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने तरुण तडफदार उमेदवार दिला आहे.

त्यामुळे यावेळी या मतदारसंघात अभिजित वंजारी यांच्या रुपाने विजय आमचाच होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसची या निवडणुकीबाबत काही नाराजी असली तर ती दूर करण्यात येईल. महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते अगदी गावपातळीवरील कार्यकर्तेसुद्धा ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत, असे ना.थोरात म्हणाले.

नागपुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहीरकर यांनी विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप करत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!