Share

सरकार ‘पाच वर्ष’ टिकवायचं आहे ; मुख्यमंत्र्यांशी योग्य ‘समन्वय’ ठेवा,’वादग्रस्त’ वक्तव्ये टाळा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: आपल्याला हे सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्या. पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठीकत शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना खात्यांतर्गत निर्णय घेताना मुख्यमंत्री ठाकरेंशी समन्वय ठेवा. वादग्रस्त मुद्दे टाळा. वादग्रस्त विधानं करु नका, अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह १६ मंत्री उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील हे बारा कॅबिनेट मंत्री आहेत. तर दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे हे चौघे राज्यमंत्री आहेत.

येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारच्या कारभारासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!