🕒 1 min read
नाशिक:- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या लग्नसोहळ्यात महाविकास आघाडीतील मंत्रीदेखील उपस्थित असल्यानं या लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे. तर, भाजपनं या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ही उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आलीय. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्या फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते हेही विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात देखील पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. या विवाह सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेततील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी खास मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या शाही विवाह सोहळ्यावर टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- स्वतःचे प्राण धोक्यात टाकून एकाचे प्राण वाचविणाऱ्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
- पंत रोहितसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह
- …तर दिवंगत इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या नसत्या – रामदास आठवले
- शिर्डी, तोरणमाळ, सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज – पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
