मुंबई : तिहार जेलमध्ये जेरबंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्याला उपचारासाठी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता छोटा राजन कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संक्रमणातून छोटा राजन बरा झाला असून त्याला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अत्यंत कडक सुरक्षेखाली त्याला पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये नेण्यात आलं आहे.
दरम्यान, मागच्या शुक्रवारी छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर अगदी काही वेळातच तो जीवंत असल्याचं स्पष्टीकरण ‘एम्स’ हॉस्पिटलकडून देण्यात आलं होतं. आता छोटा राजन कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.
छोटा राजनला 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. कारण छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली आहे आणि त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ही माहिती माध्यमांसमोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची महत्त्वाची माहिती, राज्यपालांना म्हणाले..
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

