Share

गडचिरोलीतील पुराची अखेर केंद्राने घेतली दखल, अशी होणार पाहणी  

Published On: 

गडचिरोली : नागपूर विभागातील पुरपरिस्थितीमुळे झालेल्या विविध प्रकारच्या नुकसान पाहणीकरीता केंद्रीय पथक गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयात दिनांक 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान येत आहे. या पथकामध्ये केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव, संचालक यांचा समावेश आहे.

गडचिरोली, आरमोरी तसेच वडसा तालुक्यातील गावांना भेटी देवून शेतीविषयक, घरांचे तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानाबाबत ते प्रत्यक्ष गावात जावून आढावा घेणार आहेत. सद्या कोरोनास्थिती व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावस्तरावर नागरिकांनी गर्दी न करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. केंद्रीय पथक काही गावांमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पूरबाधितांच्या शेतात, घरात जावून संवाद साधतील. त्यामूळे ज्या गावात पथक भेट देईल त्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. गावस्तरावर फक्त महत्वाच्या व्यक्ती यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी पथक दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष उपस्थित रहाणे गरजेचे आहे.

केंद्रीय पथकाकडून चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा या जिल्हयांची पाहणी होणार आहे. यामध्ये दोन पथक असून एक पथक गडचिरोली, चंद्रपूरची पाहणी करणार आहे. तर दुसरे पथक नागपूर, भंडार व गोंदिया जिल्हयाची पाहणी करणार आहे.

महत्वाच्या बातम्या:-

घ्या आता ! महाविकास आघाडीने थांबविला संजय गांधी यांच्याच नावे चालणाऱ्या योजनेचा निधी…

शिवसेना अन भाजपचे फाटलेले, पण मोदींच्या ‘या’ योजनेसाठी सेनेच्या खासदारांचे प्रयत्न 

‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!