यवतमाळ : शिवसेना यवतमाळ शहर तसेच भगतसिंग क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री स्वनिधी योजना नोंदणी अभियानाचा आज अभियानाला प्रारंभ झाला. दरम्यान शहरातील गरजु नगरपथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार भावनाताई गवळी यांनी केले आहे. नगरवासियांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे ते स्वस्त दरात वस्तु व सेवांची लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिवविकेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसाय पुन्हा प्रस्थापित होण्याकरीता खेळते भांडवलाचे पतपुरवठा तातडीने करण्याची आवश्यकता आहे.
केन्द्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेला सुरु केली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर व्यवसाय करणा-या अनेक व्यावसाईकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी केंन्द्र सरकारच्या या योजनेची माहिती सर्व छोटया व्यावसाईकांपर्यन्त पोहोचविण्याची तसेच त्यांना मदत करण्याची सुचना शिवसेनेच्या पदाधिका-यांना दिली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी व्यावसाईकांना मदत करण्याच्या उद्देशाने भगतसिंग मैदान, गेडाम नगर येथे आजपासून व्यावसाईकांची नोंदणी सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत दिनांक २४ मार्च २0२0 रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणापत्र/ ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यास नागरी स्थानिक किंवा नगर पथ विक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे.
असे पथविक्रेते, आसपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे आधारकार्ड, मतदानकार्ड, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन रेशनकार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र, पॅनकार्ड, बाजार फी वसुली पावतीआधारलिंक मोबाइल नंबर, फोटो या सर्व कागदपत्रांसह भगतसिंग मैदान येथे संपर्क करण्याचे आवाहन शिवसेना शहरच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
नवा सीमावाद : ही’ १४ गावे महाराष्ट्राचीच पण तेलंगणाने सांगितला हक्क
मराठा आरक्षणाची ठिणगी नाशिकमध्ये पडली, 3 दिवसात आक्रमक आंदोलन करणार
‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’

