Share

घ्या आता ! महाविकास आघाडीने थांबविला संजय गांधी यांच्याच नावे चालणाऱ्या योजनेचा निधी…

Published On: 

चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या योजनांचे लाभार्थी वृध्द, निराधार, अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीता हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असून, या लाभार्थ्यांचे जुन महिन्यापासून थकित असलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

या मागणी संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना पत्रे पाठविली आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या योजनांचे महाराष्ट्रात साधारणतः 34 लक्ष लाभधारक आहेत. भाजपा सरकारच्या काळात 18 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

600 रूपयांवरून 1000 रुपये, तर 2 अपत्ये असणार्‍या व्यक्तींना 1200 रूपये अशी वाढ या योजने अंतर्गत करण्यात आली आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान जून 2020 पासून थकित आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधीच आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. अशा पध्दतीने गोरगरिबांच्या हक्काचे पैसे थकित राहणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हातावर पोट घेवून जगणार्‍या लाभार्थ्यांचे थकित अनुदान तातडीने देण्याची आवश्यकता आहे.

याशिवाय पुढील दोन महिन्यांचे अनुदानही त्यांच्या खात्यात जमा करण्याची आवश्यकता आहे. शासनाने अशा पध्दतीने अनुदान थकित ठेवून गोरगरीब जनतेला त्रास होईल, या पध्दतीने वागणे निश्‍चितच संयुक्तीक नाही. राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजना व विशेष सहाय्याच्या अन्य योजनांच्या लाभार्थ्यांचे जुन महिन्यापासून थकित असलेले अनुदान त्वरित द्यावे, अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

शिवसेना अन भाजपचे फाटलेले, पण मोदींच्या ‘या’ योजनेसाठी सेनेच्या खासदारांचे प्रयत्न 

‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’

नवा सीमावाद : ही’ १४ गावे महाराष्ट्राचीच पण तेलंगणाने सांगितला हक्क

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!