मुंबई : कालचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कंगनाने आज देखील आपले शाब्दिक युद्ध सुरुच ठेवले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कंगना रणौतची चांगलीच खरडपट्टी घेतली आहे. ” अनेक शब्द बोललीस युद्ध ,उर्मटपणा मदाखवलास. ही आम्हा महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती नाही. तेव्हा गाशा गुंडाळून चालत व्हायच. माय मुंबईचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचा अपमान महाराष्ट्राचा अपमान.!!” असा इशारा देखील त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
अनेक शब्द बोललीस उध्दट ,उर्मटपणा मदाखवलास. ही आम्हा महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती नाही. तेव्हा गाशा गुंडाळून चालत व्हायच. माय मुंबईचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मुख्य मंत्र्यांचा अपमान महाराष्ट्राचा अपमान.!!@rautsanjay61 @priyankac19 @KishoriPednekar @aadeshbandekar
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) September 9, 2020
याआधी देखील विद्या चव्हाण यांनी कंगना रणौतला चांगलच फैलावर घेतले होते. ” माय मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून अपमान करणाऱ्या दिड शहाणीला माफी मागितल्याशिवाय मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. तिची सर्व मालमत्ता सील करावी. देशभक्त नव्हे!’ मोदीभक्त’ कंगनाने शहांच्या छत्रछायेत रहावे. माय मुंबईला तिची गरज नाही!” असा घणाघात चव्हाण यांनी केला होता.
आज सकाळी कंगनाने काय ट्विट केले?
कंगना रणौतने “वडिलांची पुण्याई तुम्हाला पैसा देऊ शकते पण सम्मान स्वतःला कमवावा लागतो, माझे तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखोंचा आवाज गुंजेल, कित्येकांचे तोंड बंद कराल? किती जणांचे आवाज दाबाल? कधी पर्यंत सत्यापासून दूर धावाल? तू काहीच नाहीयेस. फक्त वंशवादाचा एक नमुना आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
अनाथांना मिळणार आपल्या माणसांचे प्रेम, महिला व बालविकास विभागाची नवी योजना
मोठी बातमी : शिवभक्तांनो ‘संभाजी बिडी’चे नाव बदलणार!
अमरावतीतील ‘हे’ धोरण ठरणार ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त

