Share

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पहिला विद्यार्थी दाखल

Published On: 

धुळे : धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असून ह्या विद्यार्थ्याने हा प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून घेतला असून राजकोट येथील डॉ जिगरकुमार सामाणी हा या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमा घेणारा पहिला विध्यार्थी ठरला असून त्याने सोमवारी महाविद्यलयात आपली हजेरी लावली आहे. तब्बल ३१ वर्षानंतर म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर या वैद्यकीय महाविद्यालयात ११ विषयांसाठी ४६ विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळावी याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले होते.

रेल्वेचा मोठा निर्णय : ‘या’ तारखेपर्यंत प्रवासी ट्रेन्स बंदच राहणार

धुळे येथे १९३९ मध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाची स्थापना करण्यात आली. अखेर ३१ वर्षाने या महाविद्यलयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली, याकरिता महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ अरुण मोरे, डॉ गिरीश ठाकरे, डॉ संजय राठोड, तसेच समन्वयक डॉ दिपक शेजवळ, डॉ मूकरम खान तसेच सर्व प्राध्यपकांनी आभार व्यक्त केले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या या उर्वरित जागा लवकरच विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होणार असून, त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी व दुर्बल घटकातील रुग्णांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे आता २४ तास तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून रुग्णांना आता दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे.

कोकणात होणार गोव्यासारखं चित्र! या 8 बीचेसवर बीच शॅक्स येणार

मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी, या शासकीय महाविद्यलय व सर्वोपचार रुग्णालयातून वैद्यकीय विद्यार्थांना आधुनिक पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण मिळावे आणि रुग्णांना उत्त आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाविद्यलातील अध्यपकांची रिक्त पदे भरणे, रुग्णालयास अत्यावश्यक असेलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे महाविद्यलायची आणि रुग्णालयाची प्रगती कारणासाठी सर ते आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!