Share

विश्वात्मक संत साहित्य संमेलन होणार कोल्हापूरात; ग्रंथदिंडी, परिसंवाद, खुलीचर्चा आणि बरंच काही…

Published On: 

औरंगाबाद : गेल्या २ वर्षांच्या काळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवी मूल्यांच्या व विश्वबंधुतेच्या विचाराची गरज खऱ्या अर्थाने अधोरेखित झाली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या वर्षी औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालय या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी स्थापना वर्ष आहे. त्यामुळे विवेकानंद महाविद्यालय हे सहआयोजकाच्या भूमिकेत असल्याचे संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील यांनी सांगितले. या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, खुलीचर्चा, विविध राज्यांचे भक्तीसंगीत असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

१४, १५ व १६ जानेवारीला राज्यातील पहिलेच विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे आयोजक मुंबईचे अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन हे आहेत. संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. मदन महाराज गोसावी यांनी याबाबत सांगितले, संत ज्ञानेश्वरांच्या ७२५ वा समाधी सोहळा व संत नामदेवांची ७५१ वी जयंती यांचे औचित्य साधुन आखिल विश्वातील सर्व धर्म संप्रदायाचे अभ्यासक व उपासकांचे विचार या साहित्य संमेलनात ऐकण्यास मिळणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्रिपुराधे उपमुख्यमंत्री विष्णूदेव वर्मा यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. जगभरातील विविध धर्मपंथांचे संशोधक व धर्मगुरूंची याठिकाणी उपस्थिती असेल. आंतराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांचे चित्रप्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, भजन महोत्सव कीर्तन महोत्सव असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

संमेलनात कधी काय?

१४ जानेवारी रोजी संत बाळुमामा देवस्थान येथे बाळू मामांच्या समाधीची विधिवत महापुजा, दुपारी गोदावरीताई मुंडे यांचे सुश्राव्य भजन व लोककलावंतांचे सादरीकरण, ह.भ.प. भाऊसाहेब पाटील यांचे हरीकीर्तन होईल. १५ जानेवारीला संमेलनाध्यक्ष हभप मदन महाराज गोसावी यांच्या शुभहस्ते महालक्ष्मी मंदिरात विधीवत पुजा होईल. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून ग्रंथदिंडी निघणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!