Share

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी ४ हजार २९३ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावाला मान्यता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य आणि दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा, विविध ठिकाणी बुस्टर पंप आदी कामांसाठी ४ हजार २९३ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हायब्रीड ॲन्युटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मराठवाड्यात राबवण्यात येणाऱ्या वॉटर ग्रीड योजनेसाठी इस्त्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस सहा टप्प्यात विविध अहवाल आणि दहा प्राथमिक संकलन अहवाल फेब्रुवारी २०२०पर्यंत राज्य सरकारला देणार आहे. यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी पहिले दोन प्राथमिक संकलन अहवाल सादर करण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकूण ७३७ किलोमीटर तर जालना जिल्ह्यासाठी एकूण ४५८ किलोमीटर पाईप लाईन प्रस्तावित आहे.

या दोन्ही जिल्ह्यांसाठी या प्रस्तावित योजनेवर चार हजार २९३ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी हायब्रिड ॲन्युटी तत्त्वावर निविदा मागवण्यात येणार आहेत, या पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणे अपेक्षित असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणे प्रस्तावित आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!