लातूर: हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनी हरित शिवरस्ते अभियानाअंतर्गत शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्यासंदर्भातबुधवारी दि. १६ जून रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. १ जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीदिनी हरित शिवरस्ते अभियानाअंतर्गत मतदारसंघातील शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.
बिहार पॅटर्न किंवा इतर योजनेअंतर्गत शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्याअनुषंगाने लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व सविस्तर चर्चा करण्यात आली. या अभियानासाठी आवश्यक असलेल्या मान्यता तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले आहेत. या बैठकीत शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवडी संदर्भात चर्चा तर झालीच मात्र त्याच सोबत मतदारसंघातील इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीत खरोसा येथील लेणी परिसराचा विकासासाठी पर्यटन अंतर्गत प्रस्ताव सादर करणे, खरोसा येथील परमपोक च्या जमीनी परंपरागत करणार्या शेतकर्यांच्या मालकीची करणे, भोगवाट्यातील घरे नियमित करणे, निम्न तेरणा माकणी प्रकल्पाच्या खालील तेरणा नदीचे औराद पर्यत खोलीकरण व सरळीकरण करणे, स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायत ने प्रस्तावित जमीन संपादित करणे, श्री निळकंठेश्वर देवस्थान किल्लारी येथे भक्तांच्या सोयीसाठी वनविभागाची जमीन देणे आणि पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजनेची कामे जनसुविधा योजना प्रमाणे ग्रामपंचायतला देणे आदी विषयांवर चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

