🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आतापर्यंत या विषाणूचा अनेकांना संसर्ग झाला आहे. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अलिकडेच अभिनेता फ्रेडी दारुवाला याच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फ्रेडीचा बंगला बीएमसीने सील केला आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत देताना फ्रेडीने ही माहिती दिली. सुरुवातीला माझ्या वडिलांना ताप आणि अंगदुखीचा त्रास होत होता. मात्र वातावरणातील फरकामुळे हा त्रास होत असेल असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्यांचं आजारपण कमी होत नसल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी आम्ही त्यांची करोना चाचणी केली तर त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी घऱीच आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे, असं फ्रेडी म्हणाला.
लढा! ‘कोरोना’विरोधात : गोव्यामागोमाग आणखी एक राज्य ‘कोरोनामुक्त’
पुढे तो म्हणतो, वडिलांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवल्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास होत नाहीये. आमचं घरं मोठं असल्यामुळे सगळे व्यवस्थित स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र आम्हाला फक्त आमच्या बाळाची काळजी आहे, कारण तो फक्त १५ महिन्यांचा आहे.
‘मोदी जी देशातील माध्यमांना हेडलाईन दिली, मात्र गरिबांना हेल्पलाईनची गरज’
दरम्यान, फ्रेडीने २०१४ साली ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी’ या चित्रपटात काम केलं होतं. यात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. याशिवाय तो कमांडो 2, रेस 3 व फोर्स 2मध्येही झळकला आहे.
मजूर बेकायदेशीर निघालेच आहेत तर त्यांना पोहच करायला खाजगी वाहनांना परवानगी द्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
