अकोला : शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन जाहीर करण्यात आला होते. मात्र शनिवारी आणि रविवारी होणारे संपूर्ण लॉकडॉउन रद्द केल्याची घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. तर नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी केले आहे.
दरम्यान, अकोल्यात गुरुवारी दिवसभरात 435 रुग्ण आढळले होते. अकोल्यात सध्या 3798 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर अकोल्यात १९३२१ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी १५११९ रुग्ण बरे झाले. तर, ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू महापालिका क्षेत्रात झाले आहेत.
दुसरीकडे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून दारूचे दुकाने आणि हॉटेल पूर्णपणे बंद राहणार असून, दारू आणि जेवण यांची ऑनलाई विक्री सुरु राहनार आहे. तर २१ तारखेला कोरोनाची पुढची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल अस नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींवर काँग्रेसने केला कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप !
- ‘चंद्रकांतदादा तुम्ही सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवाच, मग तुम्हाला समजेल…’
- १ ली ते ११ वी सगळेच पास; राज्यपालांनी दिली मान्यता
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

