मुंबई: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीमध्ये, भाजपासह विरोधकांनो हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांची खरंच डोकेदुखी वाढण्याचे चित्र काहीसं निर्माण झालंय.महाविकासआघाडीतील काँग्रेसमध्ये गेले अनेक दिवस कुरबुरी चालू असल्याचं दिसून आलं आहे.
तर या वेळी काँग्रेस मधील बढे नेते व मंत्री अशोक चव्हाण हेच नाराज असल्याचं आता समोर येत आहे. अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या काही विभागाचे विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजत आहे.
अडचणी सुरूच : राम मंदिराच्या भूमीपूजनाला विरोध; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल
याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या विभागातील काही अधिकारी हे परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण कमालीचे नाराज झाले असल्याचं वृत्त आयबीएन लोकमत ने दिल आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन
दरम्यान, अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी कदाचित पेरली असेल, असं थोरात म्हणाले. अशोक चव्हाण आणि मी भेटतो. आम्ही पक्षात एकत्र आहोत. अशोक चव्हाणांच्या नाराजी ही बातमी कदाचित पेरली असेल. खाते विभाजन हा विषय आहे, पण त्यावर योग्य चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर अजून चांगलं काम होईल’, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोलापूर नंतर ८० वर्षाचा योद्धा आज नाशिकच्या दौऱ्यावर…
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या निर्णयात सहभागी करून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दिवसभर चाललेल्या या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असा कोणताही वाद नाही, असं स्पष्ट केले होते. पण, विरोधकांनी म्हणल्याप्रमाणे खाटाचे कुरकुरणे चालु असल्याचं या सर्व परिस्थितीवरून दिसतं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

