Share

 ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

Published On: 

पुणे: पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच, आज एक दुःखद घटना घडली आहे. वकिली आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह विविध वकिल संघटनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कमिटीवर देखील त्यांचा समावेश होता. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील घडवले आहेत. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत.

राज्यात ३१ जुलैनंतर लॉकडाऊनच काय? उद्धव ठाकरेंनी केला खुलासा

त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत. भास्करराव आव्हाड यांना काही दिवसांपू्र्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना दिनानाथ  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  कोरोनावर उपचार सुरू असताना  त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले होते. परंतु, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

सोलापूर नंतर ८० वर्षाचा योद्धा आज नाशिकच्या दौऱ्यावर…

नगर जिल्ह्यातील शिराळ चिंचोडी हे भास्कर आव्हाडांचे मुळगाव होते. भास्करराव आव्हाड हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे स्नेही होते. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसंच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. दैनिक सकाळसह अनेक वृत्तपत्रात त्यांचे अनेक वैशिष्ठ्य पुर्ण लेख प्रकाशित होत होते. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते.

‘मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असे नाही’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!