टीम महाराष्ट्र देशा : इंदापूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कलगी तुरा रंगलेला असतानाचं कॉंग्रेस नेते आणि इंदापूरचे माजी आ. हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराची तयारी केली आहे. त्यामुळे इंदापूरच्या जागे बाबत अजून कसलीच चर्चा नसताना आणि कोणताही निर्णय झाला नसताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक असल्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
जयंत पाटील म्हणले की, 288 जागांवर चर्चा झाली आहे. इंदापूरच्या जागेचा निर्णय शरद पवार आणि राहुल गांधी घेणार होते, पण हर्षवर्धन पाटील यांनी त्याआधीच टोकाची भूमिका घेतली आहे. तसेच काल खा. सुप्रिया सुळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
इंदापूरच्या जागेबाबत अजून सविस्तर चर्चाही झाली नाही. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांकडून प्रत्येक जागेबाबत चर्चा होत आहे. काही जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तर काही जागांवर अजून चर्चा सुरु आहे. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरही चर्चा होणार आहे. मात्र त्या आधीचं हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराची घेतलेली भूमिका ही धक्कादायक आहे, असे त्यांनी म्हंटले होते.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत पक्ष प्रवेशाबाबत कौल घेतला आहे. तसेच सभेनेही त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला आहे. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. तसेच, येत्या मंगळवारी निर्णय घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या मेळाव्यानंतर काँग्रेस हायकमांड धास्तावले आहे. तर इंदापूरच्या जागेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

