Share

shivsena । शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’; चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेतील दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर करायची होती. त्यानूसार दोन्ही पक्षांनी तीन-तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सादर करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होत. मात्र काल निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. मात्र यावेळी शिंदे गटाच्या चिन्हाचा निर्णय राखून ठेवला होता.

शिंदे गटाचं चिन्ह जाहीर-

निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.

निवडणूक आयोगाचा कालाचा निर्णय-

यानंतर आता निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!