Share

फसव्या सरकारला ओहोटी लागली; सुनील तटकरे

Published On: 

उमरी : राष्ट्रवादीची हल्ला बोल यात्रा मराठवाड्यात सुरू असून आज ही यात्रा नांदेडमधील उमरी या ठिकाणी पोहचली. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी सरकावर टीका केली. २०१४ मध्ये भाजपची देशभरात लाट होती आता मात्र या फसव्या सरकारला ओहोटी लागली आहे. असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

सुनील तटकरे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांबाबत उदासीन भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी न देऊन सरकारने बळीराजाचा अपमान केला आहे. २०१९ मध्ये भाजपला अपमानित केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असेही तटकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्याची दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने मदत जाहीर करावी अशीही मागणी यावेळी तटकरे यांनी केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, देशाचे कृषीमंत्री कोण असा प्रश्न विचारला तर शेतकऱ्यांना त्यांचे नावही ठाऊक नाही. आपले प्रश्न समजण्याची आणि ते सोडवण्याची दृष्टी असलेले नेते जनतेने निवडून दिले पाहिजे. शेतीबाबत ज्यांना आस्था आहे अशा लोकांना निवडून द्या असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले. तसेच महिला सुरक्षा हा विषय महत्वाचा आहे. मात्र याकडे लक्ष देण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही अशीही टीका अजित पवार यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!