औरंगाबाद: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद महापालिका, स्मार्ट सिटीच्या वतीने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने आयोजित सायकल राईडला औरंगाबादकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या राईडच्या माध्यमातून ऐतिहासिक दरवाजांना भेटी देत सायकलपटू व सहभागी नागरिकांनी दरवाजांचा इतिहास जाणून घेत हा पुरातन वारसा जपण्याचे वचन दिले. दरवाजांना भेटी देत स्वच्छ, सुंदर, ऐतिहासिक, स्मार्ट सिटीचा गौरव उजागर करण्याचाही संकल्प सायकलपटूंनी केला.
या उपक्रमात औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सायकलपटू, एनसीसी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक असे ७५ नागरिक सहभागी झाले होते. ज्यात ५ ते ७० वर्षांच्या सायकलपटूंसह महिला रायडर्स यांचाही लक्षणीय सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मनपा विविध कार्यक्रम राबवत आहे. रविवारी सकाळी सात वाजता क्रांती चौक येथील सायकल ट्रॅकवर या ‘सायकल फॉर फ्रीडम’ राईडचा शुभारंभ माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी अर्पिता शरद, जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील कचेश्वर, आंतरराष्ट्रीय सायकलिंग खेळाडू चरणजितसिंग संघा आदी उपस्थित होते. सायकलपटू सुरुवातीला पैठण गेट येथे दाखल झाले. शहरातील जुना व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या दरवाजातून पैठण येथे जाण्याचा मार्ग व त्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यानंतर सायकलपटूंचा ताफा मोंढा येथील जाफरगेटवर दाखल झाला. त्याची पाहणी करत शहागंज येथील निजामकालीन घड्याळाची पाहणी करण्यात आली. रोषण गेट, कटकट दरवाजालाही भेट सायकल स्वार शहरातील जुन्या वास्तूंना भेटी देत रोषण गेटवर पोहोचले.
महत्त्वाच्या बातम्या
- देगलूरमध्येही क्रांती होणार, 3 पक्षाचे अलिबाबा, चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार; सदाभाऊंचा टोला
- ‘लक्ष्मीसाठी दार उघडा, खोट्या शपथा घ्या, पैसे घ्या, पण मतदान साबणेंना करा’, सदाभाऊंचे अजब आवाहन
- रामदास आठवले यांचा मुंबईत ब्राह्मण समाजाच्या वतीने होणार सन्मान
- ‘बिग बॉसच्या घरात राहिला पैसे मिळत असले तर…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर ट्रोल झालेल्या शमिताचा खुलासा
- ‘एक रुपयाही नको..! म्हणत समांथाने नाकारली दोन कोटींची पोटगी

