मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत म्हणजे आणखी एका महिन्यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र या कालावधीत अनेक गोष्टी शिथिल होणार आहेत. 8 जून पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.अनेक अटी शिथिल होणार असल्याने याला सोशल मीडियावर अनलॉक 1 असं नाव मिळालं आहे.
…तर राऊत साहेब आपणही सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल, मनसेचा टोला
दरम्यान,शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्गवर बंदी कायम असणार आहे.सलून आणि पार्लर देखील बंद असणार आहेत.लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. परवानगी नसलेल्या रेल्वे आणि विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.
चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क, बार, मोठे सभागृह बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठे समारंभांना बंदी असणार आहे. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम आहे.
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप
सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश देण्यात येईल. लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

