Share

…तर राऊत साहेब आपणही सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल, मनसेचा टोला

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

कुठे गेले अच्छे दिन ? पेट्रोल-डीझेलचे दर भिडले गगनाला

काल दिवसभर राज्याचे राजकारण सोनू सूद वरून तापलं असताना रात्री उशिरा अभिनेता सोनू सूद याने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत अस सोनू सूद यांने स्पष्ट केलं आहे.

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला – संजय राऊत

मात्र आता यावरून मनसेने संजय राऊत यांना आपल्या शैलीत फटकारलं आहे. संदीप देशपांडे ट्विटरवर व्हिडिओद्वारे म्हणाले की, महाराष्ट्राची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तरी सरकारी रुग्णालयाच जागा मिळत नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयाची परिस्थिती अतिशय वाईट आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बिल रुग्णांकडून आकरले जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर ही रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर रुग्णांना दिलासा देण्याचं काम जरी केलं तर मी स्वत: सामना कार्यालयात येऊन तुमचे पाया पडायला तयार आहे, असं म्हणत संदीप देशापांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!